

मिस. नूपूर चतुर्वेदी
सी.ई.ओ - एन.पी.सी.आय भारत बिलपे लिमिटेड (एन.बी.बी.एल)
मिस. नूपूर चतुर्वेदी या एन.पी.सी.आय भारत बिलपे लिमिटेड (एन.बी.बी.एल) च्या सी.ई.ओ आहेत. एन.बी.बी.एल ही एन.पी.सी.आय ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे आणि देशातील सर्व आवर्ती देयकांवर प्रक्रिया करण्यासाठी अशा प्रकारचे पहिले व्यासपीठ आहे. या भूमिकेत, नूपूर यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये देशभरातील सर्व आवर्ती देयकांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह, आंतरक्रिया करणाऱ्या (इंटरऑपरेबल) आणि सुलभ देय भरण्याच्या पायाभतू सुविधांच्या एन.बी.बी.एल च्या एकूण मिशनच्या अनुषंगाने व्यवसाय धोरण तयार करणे आणि तैनात करणे समाविष्ट असेल. एन.बी.बी.एल मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी पेयू (देश प्रमुख (कंट्री हेड) - एस.एम.बी) आणि एअरटेल पेमेंट्स बँक (प्रमुख - कॉर्पोरेट व्यवसाय आणि युती (चीफ - कॉर्पोरेट बिझनेस अँड अलायन्स)) मध्ये कार्यकारी पदे भूषविली आहेत.
नूपूर यांना सिटी बँक, आय.एन.जी, सॅमसंग आणि इतर अनेक आघाडीच्या संस्थांमध्ये बँकिंग आणि वित्तीय सेवांमध्ये दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. त्यांनी बी2सी आणि बी2बी दोन्ही क्षेत्रांमध्ये पी अँड एल व्यवस्थापन, विक्री व युती (सेल्स अँड अलायन्स), विपणन तसेच उत्पादन आणि विभाग (पोर्टफोलिओ) व्यवस्थापन या सारख्या भूमिकांमध्ये काम केले आहे,. त्या एक ग्रोथ हॅकर आहेत आणि त्यांनी काम केलेल्या संस्थांमध्ये अनेक नवीन व्यवसाय आणि महसूल विभाग सुरू केले आहेत.
त्यांनी लखनौच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून पी.जी.डी.बी.एम ची पदवी घेतली आहे आणि हारकोर्ट बटलर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक केलेले आहे.