होम / कॉपीराइट

कॉपीराइट्स

ही वेबसाइट आणि त्यातील मजकूर भारताच्या कायद्यानुसार कॉपीराइटच्या अधीन आहे. कॉपीराइट भारत कनेक्ट च्या मालकीचे आहे, किंवा काही मजकूराच्या बाबतीत, तृतीय पक्षांच्या मालकीचे आहे.

भारत कनेक्ट आणि भारत कनेक्ट लोगो हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (एन.पी.सी.आय) नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत.

एन.पी.सी.आय ने या वेबसाइटवर असलेली माहिती प्रकाशनाच्या वेळी योग्य आणि सद्यःकालीन आहे याची खात्री करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु, कायद्यानुसार परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, त्या माहितीतील कोणतीही त्रुटी, चूक किंवा दोष यांची कोणतीही जबाबदारी घेत नाही.

या वेबसाइटवर तृतीय पक्ष साइट्सच्या लिंक्स आहेत. भारत कनेक्ट साइटवरून उपलब्ध करून घेतलेल्या इतर कोणत्याही साइटच्या मजकूराची विश्वासार्हता आणि सत्यता यांच्यासाठी भारत कनेक्ट जबाबदार नाही - ती माहिती साइट मालकाची जबाबदारी आहे आणि भारत कनेक्ट त्यावर कोणतेही नियंत्रण ठेवत नाही. इतर साइट्सकडे जाणाऱ्या लिंक्स केवळ सोयीसाठी प्रदान केल्या जात आहेत आणि त्या साइट्सवर देऊ केलेल्या उत्पादनांना भारत कनेक्ट कडून कोणतेही समर्थन आहे असे दर्शवित नाहीत.

फक्त माहितीसाठी भारत कनेक्टच्या वेबसाइटवर दिलेला मजकूर प्रदान करण्यात आलेला आहे. भारत कनेक्ट आपल्या वेबसाइटवर असलेल्या किंवा संदर्भाद्वारे त्यात समाविष्ट केलेल्या कोणत्याही माहितीची अचूकता किंवा परिपूर्णता यांच्याबद्दल कोणतेही विधान, प्रतिनिधित्व किंवा वॉरंटी देत नाही. भारत कनेक्ट कोणत्याही कारणास्तव माहिती चुकीची किंवा कोणत्याही प्रकारे अपूर्ण राहिल्यामुळे होणारे सर्व खर्च, तोटा, नुकसान आणि परिव्यय यांच्यासाठी सर्व जबाबदारी आणि सर्व दायित्व (मर्यादेशिवाय, निष्काळजीपणा किंवा अपकृत्य यांच्यातील दायित्वांसह) नाकारते आणि त्यांचा अस्वीकार करते.

भारत कनेक्टच्या वेबसाइट साइटवर जाणारे सर्व व्यक्ती त्याच्या मजकूराची प्रासंगिकता आणि अचूकता यांच्याबद्दल स्वतंत्र चौकशी करण्याची जबाबदारी घेणार, या आधारावर त्या वेबसाइटवरील माहिती देण्यात आलेली आहे. भारत कनेक्टच्या वेबसाइटवरून वापरकर्त्याने कोणतेही साहित्य किंवा त्यातील काही भाग उपलब्ध केल्याने, वापरल्याने किंवा डाउनलोड केल्याने होणाऱ्या कोणत्याही नुकसानीची सर्व जबाबदारी भारत कनेक्ट नाकारत आहे. सर्वोतोपरी प्रयत्न करूनही भारत कनेक्ट आपल्या वेबसाइट किंवा लिंक केलेल्या कोणत्याही साइटवरील माहिती ही कम्प्युटर व्हायरस किंवा इतर दूषण होण्यापासून मुक्त असल्याची कोणतीही हमी देत नाही.