होम / धोरणे

गोपनीयता आणि सुरक्षा धोरण

एन.पी.सी.आय/ भारत कनेक्ट सेंट्रल युनिट यांनी लागू संविधी, नियम, विनियम आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या निर्देशांनुसार आपल्या वेबसाइटवर प्रवेश करणाऱ्या व्यक्ती, त्यांचे सदस्य आणि त्यांच्या ग्राहकांकडून मिळालेल्या माहितीची गोपनीयता, गुप्तता, सुरक्षा आणि एकात्मता राखण्यासाठी पूर्ण बांधिलकी स्वीकारलेली आहे. एन.पी.सी.आय/ भारत कनेक्ट सेंट्रल युनिट माहितीचे संरक्षण, प्रकटीकरण न करणे आणि गोपनीयता यासाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मानके आणि पद्धतींचा अवलंब करते आणि त्यांची अंमलबजावणी करते.

जेव्हा एखादी व्यक्ती भारत कनेक्ट वेबसाइट वर जाते तेव्हा वेबसाइट प्रशासक अभ्यागतांच्या ब्राउझरबद्दलच्या आकडेवारीवर देखरेख करण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी कुकीजचा वापर करतो आणि यात अभ्यागताने साइटवर प्रवेश केल्याची वेळ आणि तारीख, त्याने भेट दिलेली पृष्ठे, इंटरनेट क्षेत्र (डोमेन) आणि आय.पी पत्ता ज्यावरून त्याने साइटवर प्रवेश केला आणि साइटवर प्रवेश करण्यासाठी वापरलेल्या ब्राउझिंग सॉफ्टवेअरवरील माहिती यांचा समावेश आहे. तथापि, जिथे कायदा अंमलबजावणी एजंसी क्रियांच्या लॉगची तपासणी करण्याचा अधिकार वापरू शकते, अशा तपासणीची अशक्य परिस्थिती वगळता, वापरकर्त्यांची ओळख पटविण्यासाठी वैयक्तिक तपशील गोळा करण्याचा किंवा ठेवण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही.

भारत कनेक्ट वेबसाइट अभ्यागतांना इतर अनेक वेबसाइटवर प्रवेश करू देते ज्यावर एन.पी.सी.आय / भारत कनेक्ट सेंट्रल युनिट यांचे कोणतेही नियंत्रण नाही. एन.पी.सी.आय /भारत कनेक्ट सेंट्रल युनिट अशा वेबसाइट्सचा मजकूर आणि गोपनीयता पद्धतींसाठी जबाबदार नाही. एन.पी.सी.आय /भारत कनेक्ट सेंट्रल युनिट अभ्यागतांना प्रत्येक वेबसाइटच्या गोपनीयता विधानाची तपासणी करण्यास प्रोत्साहित करत आहे.

आपण वेबसाइटवर भारत कनेक्टबद्दल चौकशी केल्यावर, आपण आम्हाला हे द्यायचे आहे :

  • नाव
  • संपर्क क्रमांक
  • ईमेल पत्ता

कोणत्याही चौकशीसंदर्भात आपण दिलेली वैयक्तिक माहिती एन.पी.सी.आय / भारत कनेक्ट सेंट्रल युनिट यांच्याद्वारे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने आणि योग्य निराकरण घेऊन आपल्याशी संपर्क करण्यासाठी गोळा केली जाणार आहे. एन.पी.सी.आय / भारत कनेक्ट सेंट्रल युनिट कायद्याने आवश्यक असल्यास किंवा आपण तशी विनंती केल्यास आपली माहिती उघड करू शकतात.

एक कॉर्पोरेट संस्था म्हणून, एन.पी.सी.आय / भारत कनेक्ट सेंट्रल युनिट आपल्या धोरणानुसार सुखरूप आणि सुरक्षित पद्धतीने आणि त्याला आवश्यक कालावधीसाठी वैधानिक तरतुदींचे आणि निर्देशांचे पालन करून आणि कायदे व नियम इत्यादींनी विहित केल्याप्रमाणे, नोंदी आणि माहिती ठेवते. कायद्याने किंवा न्यायालयाच्या आदेशाने किंवा एन.पी.सी.आय / भारत कनेक्ट सेंट्रल युनिट च्या लेखी निर्देशाद्वारे आवश्यक नसल्यास एन.पी.सी.आय / भारत कनेक्ट सेंट्रल युनिट वैयक्तिक माहिती सुरक्षित आणि गोपनीय ठेवण्यासाठी आणि वैयक्तिक माहिती इतरांना उघड न करण्यासाठी एन.पी.सी.आय / भारत कनेक्ट सेंट्रल युनिट यांच्याबरोबर व्यवसाय करणाऱ्या संस्थांशी अ-प्रकटीकरण (नॉन-डिस्क्लोजर) करारामध्ये गोपनीयता कलम समाविष्ट करते. अशा अ-प्रकटीकरण (नॉन-डिस्क्लोजर) करारांमध्ये असे नमूद केले आहे की एन.पी.सी.आय / भारत कनेक्ट सेंट्रल युनिट यांच्याबरोबरच्या व्यवस्थेतून इतर पक्षाने मिळवलेली सर्व वैयक्तिक माहिती अ-प्रकटीकरण (नॉन-डिस्क्लोजर) कराराच्या समाप्तीनंतर / करार कालबाह्य झाल्यानंतर परत केली जाईल किंवा नष्ट केली जाईल.

गोपनीय माहितीच्या मालकांना कोणतेही नुकसान किंवा हानी होणे टाळण्यासाठी कोणत्याही अनधिकृत प्रवेश किंवा डेटा सुरक्षिततेच्या उल्लंघनाविरूद्ध योग्य कार्यकारी, भौतिक, इलेक्ट्रॉनिक, प्रक्रियात्मक आणि तांत्रिक सुरक्षा आहेत याची खात्री करण्याची बांधिलकी एन.पी.सी.आय / भारत कनेक्ट सेंट्रल युनिट यांनी स्वीकारली आहे.

माहिती सुरक्षा प्रणालीची काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • माहितीचे संरक्षण करण्यासाठी फायरवॉल, एन्क्रिप्शन आणि डेटा गळती प्रतिबंधक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
  • सर्व विक्रेते आणि सेवा प्रदाते यांचे लेखापरीक्षण केले जाते आणि त्यांच्या सेवा घेण्यापूर्वी उघड न करण्याच्या (नॉन-डिस्क्लोजर) करार निष्पादित केला जातो.
  • भेद्यता आणि संभाव्य घुसखोरीसाठी एन.पी.सी.आय / भारत कनेक्ट सेंट्रल युनिट यांच्या भौतिक आणि तांत्रिक वातावरणाचे सतत निरीक्षण केले जाते आणि डेटाच्या संरक्षणाशी संबंधित कोणतीही चिंता ओळखण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी नियंत्रणांची अंमलबजावणी केली जाते.

संपर्क साधा

गोपनीयता आणि सुरक्षितता यांच्याबद्दल प्रश्न असल्यास, कृपया आम्हाला वर लिहा.