भारत कनेक्टची स्थापना का झाली?

ग्राहक नियमितपणे इतरांमध्ये सेवाव्यावस्था, आर्थिक सेवा, मनोरंजन सदस्यता आणि आरोग्याशी संबंधित खर्चासाठी देय भरत असतात. पूर्वी, भारतातील ग्राहकांना आणि सेवा पुरवठादारांना देयके भरण्यात आणि गोळा करण्यात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता.

  • बिलर्सना स्वतःची संकलन ठिकाणे आणि वेबसाइट तयार करावी लागत असे आणि त्यांची देखभाल करावी लागत असे.

  • ग्राहकांना प्रत्येक वेगवेगळ्या संकलन ठिकाणांमध्ये आणि वेबसाइट्सवर देय भरावे लागत असे

  • ग्राहकांकडे देय भरण्याच्या पद्धतीचे कमी पर्याय असत

  • भौतिक संकलन ठिकाणांमध्ये मर्यादित कामकाजाचे तास असत

  • भौतिक संकलनाची दुकाने शहरी भागाबाहेर तुरळक होती

देय भरण्याला आणि गोळा करण्याला खूप वेळ लागत होता, मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्गांचा आणि पायाभूत सुविधांचा खर्च करावा लागायचा आणि एक ते दुसऱ्या देयकापर्यंत प्रमाणनचा अभाव होता.

आज भारत कनेक्ट ने या समस्या सोडविल्या आहेत.

भारत कनेक्ट प्लेटफॉर्म काय आहे
भारत भारत
कनेक्ट प्लेटफॉर्म कनेक्ट प्लेटफॉर्म
काय आहे

भारत कनेक्ट ची संकल्पना आर.बी.आय ने मांडली होती.

हे व्यवसायांना आणि ग्राहकांना एका प्रणालीखाली आणण्यासाठी आणि देयकांचे संकलन सुलभ करण्यासाठी तांत्रिक समाधान उपलब्ध करून देते.

ग्राहकांना भारतभरातील भौतिक देय संकलन ठिकाणांद्वारे (बँक शाखा, एजंट संकलन दुकाने इत्यादी) आणि डिजिटल माध्यमांद्वारे (ॲप्स, वेबसाइट्स इत्यादी) देय भरता येईल.

ही प्रणाली जलद सेटलमेंटची सुविधा देते, एकाधिक देय भरण्याच्या पद्धतींना सहाय्य करते आणि लाखो ग्राहकांसाठी 22,000+ बिलर्स उपलब्ध करते.

आमचे ध्येय

सहकार्याच्या नवीन कल्पनांवर आधारित, सहज आणि समान अनुभव सक्षम करणारे सर्वसमावेशक मंच विकसित करणे.

आमची दृष्टी

सर्वांसाठी आर्थिक क्षमता खुल्या करणारे जाळे उभे करणे.

भारत कनेक्ट
सेंट्रल यूनिट
च्या
जबाबदाऱ्या
काय आहेत?

भारत कनेक्ट सेंट्रल युनिट (बी.बी.पी.सी.यू) ही प्रणाली चालविणारी एकमेव अधिकृत संस्था म्हणून कार्य करते.

  • व्यवसायासाठी प्रक्रिया आणि कार्यपद्धती निश्चित करते

  • भारत कनेक्टचे विपणन आणि ब्रँड स्थाननिश्चितीकरण करते

  • बी.ओ.यू, सी.ओ.यू आणि त्यांच्या संबंधित एजंट संस्था यांचे क्लिअरिंगचे आणि सेटलमेंटचे काम करते

  • ग्राहक तक्रार आणि विवाद यांची व्यवस्था करते

  • ऑपरेटिंग युनिट्स आणि त्यांचे संबंधित बिलर्स आणि एजंट संस्था यांचे ऑनबोर्डिंग करते

  • उचित एम.आय.एस आणि योग्य फसवणूक जोखीम व्यवस्थापन करते

भारत कनेक्ट प्लॅटफॉर्मचे
फायदे
काय आहेत

  • बिलर्ससाठी वेळेवर संकलन करते

    एवढ्या सोप्या प्रणालीची रचना करते, की देय भरण्याची शेवटची तारीख चुकविण्याचे कोणतेही कारण देण्याची गरज नाही.

  • ग्राहकांसाठी देय भरण्याची सुलभता

    ग्राहकांना एकाच प्लॅटफॉर्मवरून, कधीही, कुठूनही सर्व बिले भरता येतात.

  • सत् काल पुष्टीकरण (रिअल टाइम कन्फर्मेशन)

    बिलर्स आणि ग्राहक यांना एस.एम.एस किंवा भौतिक पावतीद्वारे त्वरित देय भरण्याच्या स्थानांतरणाबद्दल सूचित केले जाते.

  • अतिशय सुरक्षित लेखापालन

    प्रत्येक देय भरण्याचा व्यवहार सुरक्षितपणे डिजिटल पद्धतीने नोंदविला जातो.

  • केंद्रीकृत विवाद व्यवस्थापन

    ग्राहकांना एकाच प्लॅटफॉर्मवर कोणत्याही सहाय्य दिलेल्या बिलाबाबत तक्रारी नोंदविता येतील.

  • अस्सल घटक

    सर्व भागीदार केवळ अस्सल पक्षांशी संलग्न असतात.

भारत कनेक्ट प्रणालीचा
इतिहास काय आहे?

आर.बी.आय ने 2013 मध्ये सरकारी अंतर्गत
महसूल आदेश (जी.आय.आर.ओ)
सल्लागार समितीमार्फत
देशव्यापी अभ्यास सुरू
केला तेव्हा
भारत कनेक्टचा पाया रचला गेला.

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी

देशातील सर्वात मोठ्या सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अग्रगण्य सामाजिक विकास संस्थांशी भागीदारी करते.

आमच्या सी.एस.आर उपक्रमांबद्दल जाणून घ्या

संचालक मंडळ

आमच्या संचालक मंडळाच्या सदस्यांकडे बँकिंग आणि फिनटेक क्षेत्रात दशकांचा अनुभव आणि कौशल्य आहे.

संचालक मंडळाला भेटा
सुकाणू समिती

सुकाणू समिती

आमच्या सुकाणू समितीचे सदस्य भारत कनेक्ट परिसंस्थेसाठी मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यात सक्रियपणे भाग घेतात.

सुकाणू समितीला भेटा
भागीदार व्हा