

श्री. दिलीप असबे
संचालक
श्री. असबे यांनी एन.पी.सी.आय साठी उच्च क्षमतेचे प्लॅटफॉर्म आणि एक भक्कम टीम तयार केली आहे जी दररोज 30 मिलियनहून अधिक व्यवहारांवर प्रक्रिया करीत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आर.बी.आय) (भारत कनेक्ट सिस्टीम ची स्थापना - 2014, मोबाइल बँकिंगवरील तांत्रिक समिती - 2013, कार्ड वर्तमान व्यवहार सुरक्षित करण्यावरील कार्य करणारे गट - 2012) आणि भारत सरकारने स्थापन केलेल्या विविध समित्यांचे ते सदस्य होते.
गेल्या 20 वर्षांपासून त्यांनी आशिया पॅसिफिक क्षेत्रातील वित्तीय सेवा / देय भरण्याची परिसंस्था यांच्यात एक भक्कम नेटवर्क राखले आहे. त्यांना पी.सी.आय डी.एस.एस, आय.एस.ओ 9001, आय.एस.ओ 22301 बिझनेस कंटिन्यूटी मॅनेजमेंट सिस्टम (बी.सी.एम.एस) आणि आय.ए.सओ 27001: 2013 इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टीम (आय.एस.एम.एस), कार्यकारी प्रक्रिया आणि विविध देय भरण्याच्या प्रणाली यांचे सुरुवात ते शेवट जीवन चक्र व्यवस्थापन यासारख्या मानकांचे व्यापक ज्ञान आहे.
आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी जगभरात युरोनेटसाठी आणि भारतात प्रिझम पेमेंट्स सर्व्हिसेससाठी पायाभूत सुविधा उभारणे यासारखे मोठे यश त्यांच्या नावावर आहे. यामध्ये वितरणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि जागतिक विकास केंद्राची स्थापना करणे यांचा समावेश आहे. युरोनेट एशिया पॅसिफिकसाठी सी.टी.ओ म्हणून काम करण्यापूर्वी त्यांनी मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बी.एस.ई) आणि नंतर वेस्टर्न युनियन (डब्ल्यू.यू), यू.एस.ए येथे सॉफ्टवेअर प्रोग्रामर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
लंडन, युनायटेड किंग्डममध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (एल.एस.ई) मधून ग्लोबल मॅनेजमेंटमध्ये (एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम) मास्टर ऑफ सायन्स (एम.एस.सी) ची पदवी मेरीटवर घेतली आहे. फादर कॉन्सेकाओ रॉड्रिग्ज कॉलेज, फादर एंजल्स आश्रम, बांद्रा, मुंबई येथून त्यांनी बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग (बी.ई) ची पदवी पूर्ण केली आहे.