होम / बद्दल / संचालक मंडळ / राणा आशुतोष कुमार सिंह

श्री. राणा आशुतोष कुमार सिंह

संचालक

भारतीय स्टेट बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक (व्यवहार बँकिंग आणि नवीन उपक्रम) श्री. राणा आशुतोष कुमार सिंह 1991 मध्ये परिवीक्षाधीन अधिकारी (प्रोबेशनरी ऑफिसर) म्हणून बँकेत रुजू झाले आणि त्यांना रिटेल बँकिंग, क्रेडिट, मानवसंसाधन, आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि डिजिटल आणि व्यवहार बँकिंग यांच्यात सखोल क्षेत्र कौशल्य, व्यापक ज्ञान आणि नेतृत्वाचा अनुभव यामध्ये 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी भारत आणि परदेशात (जर्मनीत) विविध पदांवर आणि ठिकाणी काम केले आहे.

डी.एम.डी (व्यवहार बँकिंग आणि नवीन उपक्रम) म्हणून त्यांच्या सध्याच्या भूमिकेत, ते व्हर्टिकल हेड म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्याकडे व्यवहार बँकिंग, सरकारी व्यवसाय संबंध आणि नवीन व्यवसाय आणि प्रक्रिया उपक्रम यांची रणनीती आखण्याची व चालविण्याची जबाबदारी आहे.

कॉर्पोरेट सेंटर मध्ये उपव्यवस्थापकीय संचालक (धोरण) आणि प्रमुख डिजिटल अधिकारी आणि उपव्यवस्थापकीय संचालक (एच.आर) आणि कॉर्पोरेट विकास अधिकारी, चंदीगड स्थानिक कार्यालयाचे प्रमुख महाव्यवस्थापक आणि जर्मनीच्या फ्रँकफर्ट शाखेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशी त्यांनी काही महत्त्वाची कामे पार पाडली आहेत.

ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सचे प्रमाणित सहयोगी (सर्टिफाइड असोसिएट) आहेत आणि त्यांनी एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई येथून एम.बी.ए (पी.जी.ई.एम.पी) केले आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद येथे नेतृत्व विकास कार्यक्रम (लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम) मध्ये ही त्यांनी भाग घेतला आहे.