होम / बद्दल / संचालक मंडळ / पराग राव

श्री पराग राव

संचालक

श्री. पराग राव हे एच.डी.एफ.सी बँक लिमिटेड मध्ये देयके (पेमेंट्स), ग्राहक वित्त (कन्झ्युमर फायनान्स), डिजिटल बँकिंग आणि तंत्रज्ञान चे देश प्रमुख (कंट्री हेड) आहेत. देयके व्यवसायात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, प्रीपेड आणि व्यावसायिक (कमर्शियल) कार्ड, व्यापारी अधिग्रहण सेवा (मर्चंट ॲक्वॅयरिंग सर्व्हिसेस), डिजिटल देय भरण्याच्या पायाभूत सुविधा (पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर) आणि ग्राहक वित्त व्यवसाय (कन्झ्युमर फायनान्स बिझनेस) यांचा समावेश आहे. ते डिजिटल बँकिंग आणि तंत्रज्ञानाचे सुद्धा नेतृत्व करत आहेत.

श्री. राव 2002 मध्ये एच.डी.एफ.सी बँकेत विक्री आणि वितरण - क्रेडिट कार्ड प्रमुख म्हणून रुजू झाले. त्यांना तंत्रज्ञानाचे कल, ग्राहकांचे वर्तन, क्रेडिट पूर्वानुमान (फोरकास्टिंग), पी अँड एल व्यवस्थापन, विक्री आणि विपणन यांमध्ये अफाट ज्ञान आणि समज आहे आणि त्यांनी एक फायदेशीर तसेच शाश्वत देय भरण्याचे व्यवसाय तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या व्यवसायात अनेक क्रेडिट सायकल्स सहजतेने केली गेली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली एच.डी.एफ.सी बँक देशातील देयक व्यवसाय (कार्ड्स आणि अधिग्रहण) बाजारात आघाडीवर आहे आणि वर्षानुवर्षे हे स्थान कायम राखले आहे.

व्यावसायिक जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त श्री. राव एच.डी.एफ.सी बँकेच्या ग्राहक सेवा समितीचे सदस्य आहेत. 2016 मध्ये बँकेचे एच.डी.बी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विलीनीकरण होईपर्यंत त्यांनी बँकेची विक्री उपकंपनी एच.बी.एल च्या संचालक मंडळावर 6 वर्षे संचालक म्हणून काम केले. श्री. राव अनेक नेटवर्क भागीदारांच्या सल्लागाराची भूमिका सुद्धा पार पाडत आहेत. ते डायनर्स इंटरनॅशनलच्या ग्लोबल ॲडव्हायझरी बोर्ड आणि ए.पी.ए.सी क्लायंट कौन्सिल ऑफ व्हिसा यांचे सदस्य आहेत.

त्यांना या उद्योगाचा 30 वर्षांचा अनुभव आहे. एच.डी.एफ.सी बँकेत रुजू होण्यापूर्वी श्री. राव यांनी आय.बी.एम ग्लोबल सर्व्हिसेस, कॅडबरीज, युनिलिव्हर आणि पेप्सिको मध्ये वरिष्ठ पदांवर काम केले होते. जमशेदपूरच्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून (आर.ई.सी) बी.टेक पूर्ण केले आहे आणि मुंबईच्या एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून व्यवसाय व्यवस्थापन पूर्ण केले आहे.