आमचे मिशन
शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी, रोजगार वाढविणे आणि देशातील वित्तीय साक्षरतेला चालना देणे आहे.
आमचे व्हिजन
महिलांचे सक्षमीकरण करणे, पर्यावरणाचे संगोपन व संवर्धन करणे आणि आपत्तीरोधक समाज निर्मितीसाठी काम करणे.
लक्ष्य केलेली क्षेत्रे
शिक्षण आणि उपजीविका
आम्ही भारतातील काही अग्रगण्य स्वयंसेवी संस्थांबरोबर सहकार्य करून भारतातील वंचित आणि मागासलेल्या समुदायांमध्ये शिक्षण आणि उपजीविका सुधारतो. आम्ही एक सुरक्षित आणि समग्र वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो जे सर्वसमावेशकता सुनिश्चित करते, मुलांची शैक्षणिक प्रदर्शन सुधारते, शाळांमधील मुलांची नोंदणी सुधारते आणि मुले शाळेत राहण्याचे प्रमाण सुधारते (रिटेन्शन रेट सुधारतो) आणि बेरोजगार तरुणांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करते.
पर्यावरणीय टिकाव
भारताच्या समृद्ध जैवविविधतेचे रक्षण करता यावे म्हणून, जंगलांवर अवलंबून असलेल्या समुदायांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सक्षम करणे, टिकाऊ आणि कार्यक्षम नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन सुनिश्चित करणे, पर्यावरणीय आव्हानांसाठी शमन प्रमापक (पॅरामीटर्स) तयार करणे आणि मानव व प्राणी यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वन्यजीवांसह जागा वाटून घेणाऱ्या समुदायांसाठी टिकाऊ उपजीविका विकसित करणे हे आमचे उद्दीष्ट आहे.
मानवतावादी साह्य
आम्ही असे मानतो की संकट स्थितींमध्ये असुरक्षित समुदाय आणि सरकारी संस्थांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. अभूतपूर्व कोव्हिड-19 महामारीच्या काळात आम्ही अग्रगण्य एन.जी.ओ शी भागीदारी करून कोव्हिड-मदत उपक्रमांना पाठिंबा दिला आणि त्यांना हातभार लावला.
इतिहास
सुरुवातीपासूनच भारत कनेक्टने कंपनी कायदा 2013 च्या अनुषंगाने सामाजिक प्रभाव कार्यक्रम तयार करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केलेली आहे. भारतातील अग्रगण्य सामाजिक विकास संस्थांबरोबर आम्ही भागीदारी केली आहे आणि त्या भागीदारीमुळे, क्षेत्रीय कौशल्य आणि नवोपक्रम यांच्यापसून प्रेरणा मिळवून आमच्या संकल्पाला बळकटी लाभलेली आहे आणि भारतभरातील वंचित समुदायांमध्ये कायमस्वरूपी प्रभाव पाडण्यास आम्हाला मदत मिळाली आहे.
आमचे कार्यक्रम
आमचे भागीदार
-
ओरियन एज्युकेशनल सोसायटी ही एक कौशल्य विकास संस्था आहे, जी समाजातील सर्व स्तरांवर सर्वसमावेशक विकासावर प्रभाव टाकण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत आहे. भारतातील २९ हून अधिक राज्यांमध्ये उपस्थिती असलेली ओरियन एज्युकेशनल सोसायटी ही सर्वात मोठ्या कौशल्य विकास संस्थांपैकी एक आहे, जी उपेक्षित समुदायातील बेरोजगार तरुणांसाठी विविध रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, प्रवास आणि पर्यटन, रिटेल, नेटवर्किंग, हॉस्पिटॅलिटी, कृषी, मोबाईल लॅपटॉप दुरुस्ती, आरोग्य सेवा, वस्त्रोद्योग उत्पादन आणि डिझायनिंग, आदरातिथ्य आणि अशा अनेक विविध क्षेत्रांमध्ये शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यावर ती लक्ष केंद्रित करते.
-
अँथिल क्रिएशन्स ही आयआयटी खरगपूरच्या आर्किटेक्टनी स्थापन केलेली एक ना-नफा संस्था आहे, जी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या सामग्रीचा वापर करून जागांना परस्परसंवादी आणि टिकाऊ क्रीडांगणांमध्ये रूपांतरित करते. यामुळे मुलांना सर्वांगीण विकास साधण्यास मदत होते आणि त्याच वेळी अतिरिक्त प्रदूषण टाळता येते. गेल्या ५ वर्षांमध्ये, त्यांनी विविध कंपन्यांच्या सहकार्याने भारतातील २० राज्यांमध्ये २,००,००० हून अधिक मुलांपर्यंत पोहोचून आणि २१० टन टायर पुनर्वापर करून ३२० क्रीडांगणे बांधली आहेत.
-
The Learning Links Foundation is a not-for-profit trust established in 2002 with a vision to foster purpose and progress by unlocking lifelong learning. Powered by its vision to inspire true learning from an early age, the foundation offers educational, training, skilling and self-enhancement solutions that create learning links throughout life across all age groups while harnessing knowledge, innovation and technology. LLF has positively impacted over 17.8 million students and 2.2 million teachers across over 52,000 schools.